तरले तरती हा निर्धार
741.
तरले तरती हा निर्धार । नामाचि सार घेता वाचे ॥१॥
ते हे श्रीरामानाम वाचा । शंकराचा विश्राम ॥२॥
उणें पुरें नको कांही । वाया प्रवाहींपडुं नको ॥३॥
एका जनार्दनी नाम । पूर्ण चैतन्य निष्काम ॥४॥