वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

परे पडे मिठी तेथे बो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074506 · अभंग क्र. ७४०

740.
परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी ।
आवडी गिळूनिया आता जीवे नाही तुटी ॥१॥
सांगिजे बोलिजे तैसे नव्हे गे माये ।
सुमरी मारिले येणे श्रीगुरूराये ॥२॥
निवृत्तिदासा सन्निधान दुरी ।
आवडी गिळुनी आता जीवे नाही उरी ॥३॥

अर्थ :
ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी परावाणीचे मौन होते. व वैखरीही चालत नाही. त्याच्या विषयी असलेले औपाधिक प्रेमही गेल्यामुळे आता आत्मरूपाने जीवाचा नाश नाही. ते परमात्मस्वरूप बोलून सांगण्यासारखे नाही. त्या आत्मस्वरूपाचे सुमरी' म्हणजे स्मरणही त्या श्रीगुरूरायांनी नाहीसे केले. परमात्मा निवृत्तिरायांसी ऐक्य झाल्यामुळे त्याचा दास जो ज्ञानेश्वर त्याला श्रीगुरूनिवृत्तिरायांचे सन्निधानही दूर गेले. म्हणजे नाहीसे झाले. त्याच्याविषयी असणारी आवडही नाहीसी झाली. आणि जीवभावालाही थारा राहिला नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग