वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

चौदा भुवनी चौघा भुलव

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074499 · अभंग क्र. ७४६

746.
चौदा भुवनी चौघा भुलविले ।
वेव्हार नासिले स्मृति व्यालौ गे माये ॥१॥
अवघे धन देऊनि मज निधन केलै ।
ऋण मागावया धाडिले नये ते ठायी ॥२॥
ऐसे श्रीनिवृत्ति शब्दे अगाध जाले ।
माझे मीपण गेले धन देखा ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु साक्षी ।
तो मज पारखी घेऊनि गेला ॥४॥

अर्थ :
चतुर्दश भुवनामध्ये परमात्म्याचा शोध करण्याकरिता गेलेल्या चारी वेदाला त्या परमात्म्यानी भुलवून टाकले. म्हणजे परमात्मस्वरूपाविषयी वेदाचा व्यवहार चालेनासा झाला. पण अंतःकरण शुद्ध झाले तेंव्हा त्या निर्मळ अंतःकरणात त्या परमात्म्याची आपोआप स्मृति झाली. म्हणजे अंतःकरणात प्रगट होऊन माझ्या मीपणाला व्यापून टाकले. आपले सर्व धन मला देऊन म्हणजे मला परमात्मरूप करून देहात्मभावनहे जे माझे पूर्वीचे धन होते. ते सगळे निधन केले म्हणजे नाहीसे करून टाकले. परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ऋण मागायला गेले असता पुन्हा देहभावावर येणे होत नाही. तर तद्रुपस्थिति होते. अशी श्रीगुरू निवृत्तिरायांच्या उपदेशाने मी अगाध झाले. म्हणजे परमात्मरूप झाले. आणि अनात्मपदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे असे जे धन होते. ते सगळे गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे साक्षी आहेत. त्यांच्याहून परकी असलेली मी त्या मला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग