नेणो काही तुम्ही आपु
733.
नेणो काही तुम्ही आपुलिया सुखे ।
इतरांचि दु:खे पिडिति ते ॥१॥
यातना बहुवस संसारकाचणी ।
जाचति जाचणि जन्म जरा ॥२॥
व्याधिचे वळसे दरिद्राचि पीडा ।
मृत्यूची देव्हडा होता मार ॥३॥
निळा म्हणे सांपडली काळाहाती ।
नुगवति गुंती उगविता ॥४॥
