तप साधन हेचि माझे ।
736.
तप साधन हेचि माझे ।
गाईन तुझे नाम हरी ॥१॥
आणिका साधनी उबग आला ।
विश्वास उपजला येचिविशी ॥२॥
कळाकुसरी न येती मना ।
वाचूनी चिंतना तुमचिया ॥३॥
निळा म्हणे वाचे बोली ।
पडिली चाली याची परी ॥४॥
736.
तप साधन हेचि माझे ।
गाईन तुझे नाम हरी ॥१॥
आणिका साधनी उबग आला ।
विश्वास उपजला येचिविशी ॥२॥
कळाकुसरी न येती मना ।
वाचूनी चिंतना तुमचिया ॥३॥
निळा म्हणे वाचे बोली ।
पडिली चाली याची परी ॥४॥