अखंड वाचे नाम । तया
748.
अखंड वाचे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥
रामनाम वदता वाचे । ब्रह्मासुख तेथे नाचे ॥२॥
राम नाम वाचे टाळी । महादोषा होय होळीं ॥३॥
दो अक्षरासाठीं । ब्रह्मा लागे पाठोपाठी ॥४॥
एका जनार्दनी नाम । सहज चैतन्य निष्काम ॥५॥