वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

प्राण जाये प्रेत न ब

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074496 · अभंग क्र. ७४९

749.
प्राण जाये प्रेत न बोले चित्रीचे लेप न हाले ।
तैसे दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी वो करी हे शब्दची वाउगे ठेले रया ॥१॥
आता आपणिया आपण विचारी ।
शेखी प्रकृति ना पुरूष निर्धारी ॥२॥
आता प्रेताचे अळंकार सोहंळे ।
का शब्दज्ञाने जे डौरले ।
दीपने देखती काही केले ।
ऐसे जाणोनिया शीण न मनी ।
ती प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥३॥
बापरखुमादेविवरूविठ्ठल देखतांचि जे बोधले ।
ते तेणे सुखे होऊनी सर्वात्मक जे असतांची देही विस्तारले ।
येणे निवृत्तिराये खुणा दाउनी सकळ ।
बोलता शीणु झणे होईल रया ॥४॥

अर्थ :
प्राण गेलेले प्रेत बोलत नाही भितीवरील चित्र हलत नाही. त्याप्रमाणेपरमात्मस्वरूपाच्या ठिकाणी दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी आहे. असे म्हणणे खोटे आहे असे समज. याकरता तू आपल्या स्वरूपाविषयी विचार कर. विचार केला म्हणजे शेवटी प्रकृति पुरूषादि भाव आत्म्याचे नाहीत असा तुझा निर्धार होईल. अशी स्थिती झाली असता प्रपंच्याविषयी कौतुक करणाऱ्या लोकांकडे पाहिले म्हणजे त्यांचे शब्दजाळ प्रेतावर घातलेल्या अलंकाराच्या सोहंळ्यासारखे त्यांना दिसतात त्याचप्रमाणे शब्दज्ञानाने जे जे काही प्रकाशित केले ते सर्व फुकट असे न समजता व्यवहारांत कष्ट व प्रतिष्ठा भोगून अन्यता मानतात काय चमत्कार पहा. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनाल तत्वतः जाणून जे बोधवान झाले तेच सुखी झाले व या देहांत असतानाच सर्वरूप झाले ह्या खुणा मला निवृत्तिरायांनी दाखविल्या हे म्हणणे देखील निवृत्तिरायांना कष्टकर होईल असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग