आम्ही विठोबाचे दूत |
747.
आम्ही विठोबाचे दूत | यम आणू शरणागत ॥१॥
मुखे नाम हाती टाळी | महापापा करू होळी ॥२॥
करू हरिनामाचा घोष | कुंभपाक पाडू ओस ॥३॥
करू हरिकथा कीर्तन | तोडू यमाचे बंधन ॥४॥
एवढा प्रताप नामाचा | रिघ नव्हे कळिकाळाचा ॥५॥
ऐसा नामा यशवंत | विठोबाचा शरणागत ॥६॥
