वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

समसुखे शेजे निजोनिया

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074503 · अभंग क्र. ७४१

741.
समसुखे शेजे निजोनिया काज ।
साधिलेसे बीज निवृत्तिराये ॥१॥
पृथ्वीतळ शय्या आकाश प्रावरण ।
भूतदया जीवन जीवभूत ॥२॥
निजी निज आली हरपल्या कळा ।
ब्रह्मानंद सोहळा गुरूशिष्यी ॥३॥
ज्ञानदेवी काज निरालंब रूप ।
तळिवरी दीप सतेजला ॥४॥

अर्थ :
श्री निवृत्तिरायांनी जे बीज प्राप्त केले, तेच साम्यसुख असून त्या शेजेवर मी निजलो आहे. शय्या पृथ्वी आहे, आकाश पांघरूण आहे. भूतदया हे जीवाचे जीवन
आहे. अशा आत्मस्वरूपावर मला झोप लागली असून त्या झोपेत असणारा ब्रह्मानंदाचा सोहळा मी भोगित आहे. आपल्या स्वरूप महिमेवर प्रतिष्ठित असणे यातच माझे सार्थक आहे. आणि त्या आत्मस्वरूपाचा प्रकाश चहूकडे व्याप्त आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग