रामनामेंसुख अत्यंत ज
740.
रामनामेंसुख अत्यंत जे आहे । म्हणोनि मना ध्याये नित्य नाम ॥१॥
सुखाचिया गोडी जया नाही ठावीं । ते ते नर असोनिया देही प्रेतवत ॥२॥
शंकर जाणोनि स्मशानी राहिला । अनुभव तो त्याला तोचि जाणे ॥३॥
एका जनार्दनी सुखाचेंजें सुख । रामनाम देख पवित्र मुखी ॥४॥
