नामावाचूनि काही दुजे
733.
नामावाचूनि काही दुजे येथे नाही | वेगी लवलाही राम जपा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ | पावसी केवळ निजपद ॥२॥
ध्रुव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध | नामेचि विदगत पावले देखा ॥३॥
नामा म्हणे राम वाचे जया नाम | संसाराचे श्रम हरे नामे ॥४॥
