वैखरी वाचा वदे रामकृ
749.
वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगी त्याचा ॥१॥
आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्यांचे चरण चुरी ॥२॥
शिव विष्णु ब्रह्मा इंद्रादिक देव । करिती गौरव त्याचा बहु ॥३॥
जनार्दनाचा एका सांगतसे उपाव । धरा नामी भाव दृढ जनी ॥४॥
