हरिविण देह मळीण सर्व
741.
हरिविण देह मळीण सर्वथा | मंगळाची कथा रामकृष्ण ॥१॥
कथा करी कोणी ऐकती जे जन | वैकुंठभुवन हाता आले ॥२॥
वेदशास्त्रा सार नामाचा उच्चार | अंती पैल पार दाखवितो ॥३॥
जन्मोनिया जगी अलिप्त असावे | नाम ते स्मरावे म्हणे नामा ॥४॥