वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

घ्या रे रामनामाची का

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087687 · अभंग क्र. ७५०

750.
घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥
अकार उकार मकार तिचा पाया । उभारिले त्रिगुण तनयां ॥२॥
हरिहर कावड घेता खांदी । तुटे जन्ममरण व्याधी ॥३॥
घेऊनि कावडी नाचे एका । एका जनार्दनी आवडी देखा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग