वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

श्रीरामनाम पावन क्षि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087724 · अभंग क्र. ७४२

742.
श्रीरामनाम पावन क्षिती । नामे दोषा होय शांती ।
नामेंचि उद्धरती । महा पातकी चांडाळ ॥१॥
नाम पावन पावन । शंभु राजा जपे जाण ।
इतरां ती खूण । न कळेचि कल्पातीं ॥२॥
नाम श्रेष्ठ तिही लोकी । त्यांची कीर्ति जो घोकी ।
जाय सत्यलोकी । नाम घेता प्राणी तो ॥३॥
एका जनार्दनी नाम । पावविते निजधाम ।
स्त्रियादि अंत्यजां सम । सारिखेंचि सर्वांसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग