जयजय रामचंद्रा जयजय
747.
जयजय रामचंद्रा जयजय रामचंद्रा । हर हरि जपे त्याचे हृदयी मुद्रा ॥१॥
सोपा जप अखंड वाचेसी वदता । कामक्रोध लोभ पळे अहं ममता ॥२॥
कासया जप तप अनुष्ठान वाउगा श्रम । नका गुंतू संसारा वाचे म्हणा रामनाम ॥३॥
वाउगी उपाधी सांडोनी भजा श्रीरामा । एका जनार्दनी वाचे वदा अत्मारामा ॥४॥
