आपुले काही न विचारित
745.
आपुले काही न विचारिता धन ।
निर्गुणासी ऋण देऊ गेलेंII१॥
थिथे होते ते निध सांठविले ।
विश्वासे घेतले लक्षवित ॥२॥
ऐसा हा निवृत्तिप्रसादु फळासी आला ।
निर्फळ केला मज निर्गुणाकारे ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु साच म्हणोनि रिघालो ।
तेणे नेऊनि घातलो निरंजनी ॥४॥
अर्थ :
माझी काय स्थिती होईल याचा काही एक विचार न करता निर्गुण परमात्म्याशी ऋण देण्याचा व्यवहार करू गेले. त्यामुळे मज जवळ असलेले माझे धन म्हणजे परमात्मरूप माझ्या ठिकाणी साठवले आणि विश्वासाने तत्पद लक्ष्य हेच धन मी घेतले. या रितीने हा श्रीगुरूनिवृत्तिरायांचा प्रसाद फलद्रूप झाला. आणि मी मानीत होतो तो सर्व संसार निष्फळ होऊन निर्गुण परमात्मरूप झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हेच खरे आहेच. म्हणून त्यांचे ठिकाणी त्यांचे प्राप्तीकरता म्हणून निघालो. तर त्यांनी मला निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन पोहोचते केले असे माऊली सांगतात.
