वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ८, श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८

अनुभवे अनुभवु बोधा ब

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074502 · अभंग क्र. ७५१

751.
अनुभवे अनुभवु बोधा बोध आथिला ।
निःशब्दी निःशब्द नादावला ॥१॥
माझा श्रीगुरू ब्रह्म बोलणी बोलवीतु ।
तेथील संकेतु कोण्ही नेणे ॥२॥
निवृत्तिप्रसादे म्या ब्रह्मचि जेविले ।
ब्रह्म ढेंकरी पाल्हाईले नेणोनिया ॥३॥

अर्थ :
अनुभवाचा जो अनुभव, ज्ञानाचे ही ज्ञान, निःशब्दाचे शब्द, असलेला जो माझा श्रीगुरू निवृत्तिराय तो अशा प्रकारचा ब्रह्मस्वरूपाच्या गोष्टी सांगत आहे. या श्रीगुरूंच्या उपदेशाचे वर्म, अधिकारी, मुमुक्षुशिवाय कळणार नाही. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या प्रसादाने मी सर्व जेवण ब्रह्मरसाचेच जेवलो आणि ब्रह्माचीच ढेकर देऊन तृप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग