मंत्रांचा पै मंत्र ह
738.
मंत्रांचा पै मंत्र हरी हरी उच्चार | न लागे तो विचार करणे काही ॥१॥
सुफळ नाम गाढे वाचेसि उच्चारू | केशव हाचि करू सर्वांभूती ॥२॥
नाही यासी पतन न होईल बंधन | नित्य हेचि स्नान रामनामे ॥३॥
नामा म्हणे भाव सर्वांभूती करा | आणिक पसारा घालू नका ॥४॥
