सांगताती दाया | तुम्
304.
सांगताती दाया | तुम्हा पुत्र जाला राया ॥१॥
एकतांचि ऐसे कानी | हर्ष न समाये मनी ॥२॥
|उठा उठा वो त्वरेसी | पाचारावे वसिष्ठासी ॥३॥
ब्राह्मणासी पाचारा | सांगा सर्व नारीनरा ॥४॥
|फोडा फोडा रे भांडारे | आणवा गाईंची खिल्लारे ॥५॥
उभवा उभवा रे गुढी | सोडा वस्त्रांची गाठोडी ॥६॥
झाडोनिया टाका खडे | घाला केशराचे सडे ॥७॥
नामा म्हणे भूमंडळा | स्वामी माझा पहा डोळा ॥८॥
