आपुले आपण करावे कारण
311.
आपुले आपण करावे कारण । दुजीयासी खूण न कळेचि ॥१॥
जयाचा ठेवा तो तयासीच ठावा । येरा कळे हेवा त्याचा कांही ॥२॥
जयाची खूण तयासीच ते ठायी । येरा नेणे जीवी सोय त्याची ॥३॥
चोखा म्हणे माझा नामया तो भला । उगाणा दाविला अनुभवाचा ॥४॥
