वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

त्रैलोक्य पिळता उबगल

🙏 3. संत तुकाराम · ABH-077547 · अभंग क्र. ३११

311.
त्रैलोक्य पिळता उबगला नाही । आमचे त्या काई असे ओझे ॥१॥
पाषाणाचे पोटी बैसला दुर्दुर । तया मुखी चारा कोण घाली ॥धृपद॥
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥

अर्थ :
या देवाला त्रैलोक्याचे पालन करताना कंटाळा येत नाही आमचे कसले ओझे आहे. पाषाणाच्या पोटात बेडूक बसलेला असतो मग त्याच्या पोटात कोण अन्न घालते. काही पक्षी, अजगर हे कधीही अन्न शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत पण तरीही तो त्यांचे पोट भरतो. तुकाराम महाराज
म्हणतात या पांडुरंगावर सर्व भार घातला तर तो दयाघन कधीही कोणाची उपेक्षा करीत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग