वरवरी सांग सांगाव्या
308.
वरवरी सांग सांगाव्या त्या गोष्टी ।
जवरी नाही भेटी आत्मज्ञानी ॥१॥
कासयासी वेष धरी नाना सोंग ।
थोडी तैसी जगी श्वान खरे ॥२॥
काय सांगोनिया लांब लांब गोष्टी ।
जवरी नाही भेटी आत्मत्वाची ॥३॥
बहेणि म्हणे मज दिसती कथन्या ।
जवरी नाही मना अनुतप ॥४॥
