रूदन स्फुंदन अहर्निश
303.
रूदन स्फुंदन अहर्निशी करी । परी वाचे हरी हरी जप सदा ॥१॥
न लागे गोड खाता पाणी पिता । आवडी सर्वथा पंढरीची ॥२॥
निद्रा न लागे करी ऊठी बसी । म्हणे देवा ऐसी तुटी का केली ॥३॥
दिन रात हेचि होय मनी चिंता । चोखा म्हणे आता काय करू ॥४॥
