भले बोलोनी दाविले मज
307.
भले बोलोनी दाविले मज ।
आत्मज्ञान सांगेन तुज ॥१॥
मनाचा प्रकाशु थोरु ।
मनेंचि ब्रह्म उजियेडु ॥
निवत्ती सेवियेला सुघडु ।
तेणे मज जाहाला ब्रह्माचा पाडु ॥३॥
अर्थ :
तुला जीवब्रह्मैक्यज्ञान सांगेन असे श्रीगुरुनी अभयदान दिले. त्या प्रमाणे उपदेश केल्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार झाला. विषयाचा प्रकाश करण्यामध्ये मनासारखे साधन नाही आणि याच कारणामुळे मनात ब्रह्म सहज स्वभावाने प्रकाशित झाले माझी योग्यता नसताना ही श्रीगुरु निवृत्तीरायांनी मजवर अनुग्रह केल्यामुळे मी ब्रह्मस्वरुप झालो. असे माऊली सांगतात.
