त्यांचिया इच्छेसारखे
308.
त्यांचिया इच्छेसारखें करावे । त्यांच्या मागे जावे वनांतरीं ॥१॥
वनासी जाऊनी नानापरी खेळे । हमामे हुतुतु बळे गडी घेती ॥२॥
सर्वांघडी संता सर्वावरिष्ट देव । तयावरी डाव गाडी घेती ॥३॥
अंगावरी डाव आला म्हणती गोपाळ । देई डाव सकळ आमुचा आम्हा ॥४॥
पाठीवरी बैसती देवतें म्हणती । वांकरे श्रीपति वेंगी आता ॥५॥
एका जनार्दनी गडियांचे मेळी । खेळे वनमाळी मागे पुढे ॥६॥
