बोलवती बोल फुकाचे प्
309.
बोलवती बोल फुकाचे प्रबळ ।
परि ते प्रेम-बोल दुर्लभ हे ॥१॥
काय त्या सांगाव्या नुसत्या ज्ञानगोष्टी ।
जवरी नाही भेटी स्वानुभवी ॥२॥
ज्ञान सांगवेल ब्रह्म दाखवेल ।
स्वानुभव-बोल दुर्लभ ते ॥३॥
नाना जपतप करिती अनुष्ठान ।
परि ब्रह्मज्ञान न कळे कोणा ॥४॥
षड्दर्शनाची दाखविती सोंगे ।
वैराग्यही आंगे बोलवेल ॥५॥
बहेणि म्हणे कळा दावेल ज्ञानाने ।
परि ते प्रेम-खूण वेगळीच ॥६॥
