वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

आपणासी आपण उपदेश कीज

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074804 · अभंग क्र. ३०८

308.
आपणासी आपण उपदेश कीजे ।
गुरुमुख बुझिजे तेचि तू ॥१॥
मी ते कवण हे तू जाण ।
बुझे निर्वाण तेचि तू ॥२॥
सिद्धचि सांडूनि निघसी अनानी ठायी ।
तू रिघे पा सोई संताचिये ॥३॥
जे तपाव्रताचे ठायी ते तेथेचि पाही ।
परी ते ठायीच्या ठायी म्हणे ज्ञानदेवो ॥४॥

अर्थ :
गुरुमुखाने ते ब्रह्म तु आहेस असे समज असा उपदेश केल्यानंतर आपणच आपणाला उपदेश करावा. तो दृढ निश्चय होण्याकरिता अगोदर तत् त्वम् ' पदार्थाचा शोध घ्यावा मी व परमात्मा शोधावा. हा विचार करावयाचे सोडून मायिक पदार्थाच्या ठिकाणी कशाला हिंडत बसावे ? त्यापेक्षा संताना शरण जाऊन त तपामध्ये व्यापक असलेले ब्रह्मस्वरुप आपल्या ठिकाणी जागचे जागी जसे आहे तसे पाहावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
अभंग उबलब्ध नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग