वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 16. हरिश्चंद्र आख्यान

ऋषि आश्रमा येउनी । य

🙏 16. संत जनाबाई · ABH-073920 · अभंग क्र. ३१०

310.
ऋषि आश्रमा येउनी । येता देखे ताराराणी ॥1॥
भाव करुनि तात्काळ । कैसा निर्मिला नृपाळ ॥2॥
येऊनि आश्रमासी पाहे । डोळा देखियेला राय ॥3॥
शुद्ध सुमन सेजे नीरा । वालिताती विंझणवारा ॥4॥
सुगंध चंदन चर्चिती । नानापरींच्या उटया देती ॥5॥
रत्‍नखचिताची झारी । राय घेऊनिया करी ॥6॥
करी आनंदे प्राशन । पुढे दिव्यान्न भोजन ॥7॥
ऐसे करिता अवलोकन । राजा पाहे शामवदन ॥8॥
नव्हे तोचि कैसे झाले । सूर्या अंधत्व आले ॥9॥
पुष्पभार शेषावरी । कैसा आजि झाला भारी ॥10॥
ध्रुव मेरु गजबजिला । तैसी परी झाली रायाला ॥11॥
जोडोनिया करपद्मा । म्हणे बरी केली सीमा ॥12॥
ऐसे होते जरी मनी । तरी का राज्य दिले दानी ॥13॥
बुद्धि भविष्यानुसार । मी तो आहे येथे स्थिर ॥14॥
म्हणोनिया पुढे जाय । अव्हेरिले धर्मपोय ॥15॥
मार्गी देखियेले राया । जनी म्हणे लागे पाया ॥16॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग