प्रकरण :- ॥ नामदेव स
304.
प्रकरण :- ॥ नामदेव स्तुती॥
अखंड ते चित्त वेडावले मन । कोण आवरोन धरी यासी ॥१॥
काय बा करावे काय बा करावे । वोखटे सांगावे कवणापाशी ॥२॥
न करावे ते करिताहे बळे । आमुचिये मेळे न मिळेची ॥३॥
चोखा म्हणे आता कवणासी लागू । तोंडायाचा सांगू नामदेव ॥४॥
