असंग हा संग होतसे अन
309.
असंग हा संग होतसे अन्याय । कवण तो उपाय न सुचे यासी ॥१॥
अवघाचि मातेरा केलासे देहाचा । साच ते सुखाचा नाश केला ॥२॥
बीज ना फळ फोलकट झाले । सेवटासी आले रिते माप ॥३॥
मोजिता मोजिले दृष्टिने पाहिले । चोखा म्हणे गेले वांयाविण ॥४॥
