वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

सकळहि कळा बिंबोनी नि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074737 · अभंग क्र. ३०५

305.
सकळहि कळा बिंबोनी निराळे ।
ते तू घेऊनी ऊगले राहे रया ॥१॥
ते तत्त्वता तत्त्व घेई का एकत्त्व ।
या मना महत्त्व देऊनिया ॥२॥
निरालंब निराकार पाहे ते अपरंपार ।
ते तू परात्पर होऊनि राहे ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु सकळहि कळा प्रकाशकु ।
तोचि सर्वव्यापकु जाणोनी राही ॥४॥

अर्थ :
ज्याच्याठिकाणी सर्व कला आहेत पण स्वरुपदृष्टिने ते वेगळे आहे. असे ते परमतत्त्व जाणून स्वस्थ राहा. पण याला मनाची अनुकुलता पाहिजे याकरिता त्या मनाला मोठेपणा देऊन परमात्मतत्व जाणून घे. निर्विषय निराकार, अमर्याद असे जे परमतत्त्व ते तू होऊन राहा. सर्व कलांचा प्रकाशक माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सर्वव्यापक आहेत. त्याचे ज्ञान करुन घे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग