तोवरी ह्या गारा झगमग
307.
तोवरी ह्या गारा झगमगती सैरा ।
जवरी नाही हिरा दृष्टीपुढे ॥१॥
मग तो निवाडा आपोआप कळेल ।
जाळावे ते बोल वायावीण ॥२॥
तोवरी ह्या सिंपी दिसती सोज्वळ ।
जवरी न कळा मोतियांची ॥३॥
बहेणि म्हणे नाही फुकाचे बोलणे ।
करोनी दाविण क्रिया तैसी ॥४॥
