वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 133. रामचरित्र

रामचरित्र

🙏 4. संत नामदेव · ABH-083019 · अभंग क्र. ३११

311.
रामचरित्र

धन्य ते संसारी पवित्र ते वाणी | अखंड उच्चारणी रामनाम ॥१॥
तयांचीच एक सरली येरझार | उतरले पार भवनदी ॥२॥
वधोनी ताटिका सुबाहुही देख | सिद्धी नेला मख कौशिकाचा ॥३॥
पहावया यावे स्वयंवर सीतेचे | आले जनकाचे पत्र तेथे ॥४॥
मारगी चालता ब्रह्मयाची बाळा | उद्धरली शिळा पदरजे ॥५॥
मोडील धनुष्य तया हे देईन | केला होता पण जनकाने ॥६॥
रावणादि राजे आले थोर थोर | त्यांचा उतरला नूर पाहातांची ॥७॥
अहर्निशी जया ध्यानी ध्याय भोळा | तो उठला सांवळा बाप माझा ॥८॥
सुरा असुरा असाध्य ऐसे ते प्रचंड | ते ती ठायी कोदंड मोडियेले ॥९॥
पाहोनिया ऐसे नामा म्हणे बळ | सीता घाली भाळ रघुबीरा ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग