मूर्खासी बोलता कोण स
302.
मूर्खासी बोलता कोण सुख चित्ता ।
म्हणऊनी वार्ता सांडावी ते ॥१॥
असावे आपुल्या आनंदी सर्वदा ।
करावी गोविंदासवे मात ॥२॥
उचलोनी दगड पाडावा चरणी ।
तैसी मात जनी घडो नये ॥३॥
बहेणि म्हणे सदा दावा या दोघांसी ।
आहे परमार्थासी प्रपंच्याचा ॥४॥
