। ऐक प्रेमभाव तयांचा
307.
। ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥
गोधनें राखणे उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥
सवंगडियांचे मेळी खेले वनमाळी । घोंगडी ते काळी हाती काठी ॥३॥
त्रैलोक्यांच्या धनी वाजवी मुरली । भुलवी गौळणी प्रेमभावे ॥४॥
घरोघरी चोरी करितो आदरे । एका जनार्दनी पुरे इच्छा त्यांची ॥५॥
