पोई अव्हेरिता राय ।
309.
पोई अव्हेरिता राय । मागे ऋषि धावताहे ॥1॥
धन्य धन्यरे नरेंद्रा । हाती धरी हरिश्चंद्रा ॥2॥
उष्ण न ध्यानी कहार । मार्गी श्रम झाला फार ॥3॥
करा आश्रम पुण्यता । आम्हा घडो द्यावे तीर्था ॥4॥
येथे केलिया आराम । व्यर्थ जाती वांया श्रम ॥5॥
क्रमा चार दिवस । पहा पोईचा हा वास ॥6॥
द्यावी आम्हा सर्व जोडी । कृपा कराल ती थोडी ॥7॥
करा आनंदे भोजन । सुवासित उदकपान ॥8॥
म्हणे जावे आश्रमाला । पुढे पंथासी लागला । ॥9॥
त्राहे त्राहेरे जगदीशा । सत्त्व रक्षिसील कैसा ॥10॥
ऐसा छळक हा ऋषि । नेणो पार कैसा नेशी ॥11॥
आमची चिंता तुजला हरी । जनी म्हणे कृपा करी ॥12॥
