वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आकाश कडकडी मेरू हा ल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075928 · अभंग क्र. ३०४

304.
आकाश कडकडी मेरू हा लडबडी ।
परी ते सुख-गोडी सांडू नये ॥१॥
ऐसीया निर्धाराजवळी आहे देव ।
न धरावा संदेह अरे मना ॥२॥
पृथ्वी जरी बुडे डगमगती दिशा ।
तरी या जगदीशा सोडू नये ॥३॥
शीत उष्ण जरी वरूषे हा पाऊस ।
तरी कासावीस होऊ नये ॥४॥
वायु जरी सुटे ब्रह्मांडही हे आटे ।
तरी आत्मनिष्ठे भंगू नये ॥५॥
बहेणि म्हणे तेथे जीव तो कायसा ।
ऐसी पूर्ण दशा आचरावी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग