वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 16. हरिश्चंद्र आख्यान

विश्वामित्रे जाऊनि प

🙏 16. संत जनाबाई · ABH-073915 · अभंग क्र. ३०४

304.
विश्वामित्रे जाऊनि पुढे । वणवा लाविला चहूकडे ॥1॥
धूम्रे दाटले अंबर । ज्वाळा येती भयंकर ॥2॥
विश्वामित्रे काय केले । राया बाळाते चुकविले ॥3॥
दोघे न पडती दृष्‍टि । होवोनिया परम कष्‍टी ॥4॥
म्हणे अहा कटकटा । काय लिहिले अदृष्‍टा ॥5॥
मेले वणव्यात जळोनी । ऐसे आले तिचे मनी ॥6॥
पिटीललाट करतळे । जंग टाकी धरणी लोळे ॥7॥
म्हणे बाळा रोहिदासा । भेट देईंगा पाडसा ॥8॥
सूर्यवंशी चुडारत्‍ना । प्राणपति गा निधाना ॥9॥
राव दृष्‍टि न पडता । अग्नि खाईन तत्वता ॥10॥
ऐसे विचारिले मनी । म्हणे नामयाची जनी ॥11॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग