वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 16. हरिश्चंद्र आख्यान

ऋषि म्हणेरे समर्था ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073910 · अभंग क्र. ३०२

302.
ऋषि म्हणेरे समर्था । असो स्वप्नीची हे वार्ता ॥1॥
इच्छा धरुन आलो येथे । औट तुक दे कनकाते ॥2॥
कृपा करुन द्याल जरी । उदक घाली माझे करी ॥3॥
दया करा आम्हावरी । आले पाहिजे नगरी ॥4॥
थे संकल्पावाचून । नाही होत माझे येणे ॥5॥
राये घेउनी जीवन । ऋषि हस्तकी घालून ॥6॥
विश्वामित्र शिविकासनी । राव चालिला घेउनी ॥7॥
मार्गी वाद्यांचा लाघव । अयोध्येसी आला राव ॥8॥
राव प्रवेशला नगरी । विश्वामित्र बैसला द्वारी ॥9॥
दंड पडताळूनि हाती । लक्षियेली तारामती ॥10॥
उभी थरथरा कांपत । राया जाणविली मात ॥11॥
राव म्हणे ऋषेश्वर । कोण्या अन्यायाने मार ॥12॥
केला संकल्प आम्हासी । नाही दिले द्क्षणेसी ॥13॥
दान न देता आम्हासी । तू का गेलासी सदनासी ॥14॥
हात बांधोनिया राया । दंडहस्ते मारी तया ॥15॥
तव आला रोहिदास । चरणी ठेवी मस्तकास ॥16॥
येरु रक्तांबर नयन । पुसे कवणाचा कवण ॥17॥
राव म्हणे कुळभूषण । आहे आमुचा नंदन ॥18॥
राजा पाचारी भांडारी । आणा कनकाते झडकरी ॥19॥
मज दिले राज्यदान । तेचि घेसी तू परतोन ॥20॥
छत्र मुद्रा सिंहासन । ऋषि हस्तकी ओपून ॥21॥
हे तो आले राज्यदाने । औट भार कनक देणे ॥22॥
धनवत सौदागर । उभे रायाचे समोर ॥23॥
धन देतो जी अपार । सोडा रायाला सत्वर ॥24॥
विश्वामित्र म्हणे त्यासी । काय करावे द्रव्यासी ॥25॥
क्षितिवरी जितके धन । तेहि माझेचि संपूर्ण ॥26॥
नाही कोणाचा उपाव । जनी म्हणे रक्षील देव ॥27॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग