वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

भ्वावे जो शरीरा तो श

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076081 · अभंग क्र. ३०५

305.
भ्वावे जो शरीरा तो शरीर हे मिथ्या ।
तेथे आता चिंता कासयाची ॥१॥
विचारावे मना आपुल्या आपण ।
धरावे निर्वाण निजरूपी ॥२॥
जिवासी ते भ्यावे अविनाश दिसे ।
जन्ममरण फासे कोण भोगी ॥३॥
बहेणि म्हणे येथे लटिके मीपण ।
करी जन्ममरण वेरझारा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग