वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 131. श्रीराम माहात्म्य

भांडारी येऊनि करिती

🙏 4. संत नामदेव · ABH-083512 · अभंग क्र. ३०८

308.
भांडारी येऊनि करिती प्रार्थना | द्विजांसी दक्षिणा काय द्यावी ॥१॥
जया लागे जितुके तितुके त्याने घ्यावे | तुम्ही न रहावे उभे तेथे ॥२॥
धांवताती तेव्हा विप्र सकळिक | एकावरी एक पडताती ॥३॥
करू नका घाई सर्वांसी पुरेल | न राहे दुर्बळ यांत कोणी ॥४॥
नामा म्हणे ऐसे धन वांटी राजा | सुखी केल्या प्रजा सकळिक ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग