जयासी स्वहित करणे अस
303.
जयासी स्वहित करणे असे मनी ।
तेणे द्यावी जनी पाठी जगा ॥१॥
म्हणो का मग जग वेडे अथवा मूर्ख ।
आपुले ते सुख सांडो नये ॥२॥
सांडावी ते लाज जन-लोकाचारी ।
जयासी श्रीहरि पाहिजेल ॥३॥
म्हणवावे जनी प्रपंची भ्रष्टला ।
परी त्या स्वहिताला सांडू नये ॥४॥
बहेणि म्हणे जन त्रिविध प्रकार ।
आपुले साचार सांडू नये ॥५॥
