वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 131. श्रीराम माहात्म्य

कारितसे स्नान अयोध्य

🙏 4. संत नामदेव · ABH-083503 · अभंग क्र. ३०६

306.
कारितसे स्नान अयोध्येचा पाळक | वस्त्र अमोलिक परिधान ॥१॥
लावोनिया भाळी कस्तुरी केशर | करी नमस्कार वसिष्ठासी ॥२॥
पुण्याहवाचनी बसे दशरथ | त्रिभुवनी समर्थ तूंचि एक ॥३॥
वेदमंत्र घोष करिती ऋषीश्वर | पुष्पे सुरवर वरुषती ॥४॥
आणिती आहेर अयोध्येचे जन | करिती गायन गायक जे ॥५॥
नाचती अप्सरा वाजती नगारे | वाजंत्री तुतारे भोंवारे ही ॥६॥
|गुलालाची धूम रंग वस्त्रावरी | बंदीजन द्वारी गर्जताती ॥७॥
नामा म्हणे इंद्रे पाहोनिया सभा | नाही ऐसी शोभा चित्ती म्हणे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग