पंथ क्रमिता तिघांसी
306.
पंथ क्रमिता तिघांसी । आडवा आला कपटवेषी ॥1॥
होवोनिया वृद्ध विप्र । हाती काठी भार्याकुमर ॥2॥
म्हणे धन्यरे नृपेशा । तुझी कीर्तिघोष ठसा ॥3॥
भेरी गर्जती त्रिभुवनी । धावून आलो मी ऐकुनी ॥4॥
आज्ञा करावी जी स्वामी । तुमचे शरणागत आम्ही ॥5॥
करुणा दाखवी रायासी । दीन आम्ही तीर्थवासी ॥6॥
पुढे प्रवास कठीण । पायी नाही पायतण ॥7॥
तिघा बोपोनिया जोडे । जनी म्हणे जाती पुढे ॥8॥
