राखीत गोधनें भक्ताचि
301.
राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥
आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥
उच्छिष्ट काढणें सारथ्य करणे । उच्छिष्ट ते खाणे तयांसवें ॥३॥
चुकतां वळती आपण वोळणें । एका जनार्दनी पुण्य धन्य त्यांचे ॥४॥
