वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 16. हरिश्चंद्र आख्यान

येता देखोनिया बाळ ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073913 · अभंग क्र. ३११

311.
येता देखोनिया बाळ । ऋषि धावला तात्काळ ॥1॥
कडे घेऊनि तयाला । ऋषि आश्रमासी आला ॥2॥
तुझे मायबापी प्रेम । होय पाहोनी आराम ॥3॥
सुखे करुनी भोजन । सुवासित उदकपान ॥4॥
करुनी क्रमियेले पंथा । तिही सांगितली वार्ता ॥5॥
बाळ येतसे मागून । त्याचा परामर्ष करणे ॥6॥
म्हणोनी सारिले विंदान । पुढे वाढिले दिव्यान्न ॥7॥
रडे मोकलुनी धाय । येथे कल्पांती न राहे ॥8॥
पुढे लागला पंथासी । ऋषि तटस्थ मानसी ॥9॥
वदनी बोट घाली वोजा । ऋषि करीतसे चोजा ॥10॥
ऐसे सत्त्वादिकांपुढे । तप खद्योत बापुडे ॥11॥
काय करणे ऐशियांसी । व्यर्थ मुकलो तपासी ॥12॥
मार्गी तिघें एक झाली । दासी जनी आनंदली ॥13॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग