वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संत म्हणविता लाज नाह

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075888 · अभंग क्र. ३११

311.
संत म्हणविता लाज नाही चित्ता ।
जवरी आसक्ति विषयांची ॥१॥
गाढवाचे परी दिसे जिणे त्याचे ।
काय त्या सोंगाचे घेउनी फळ ॥२॥
संत म्हणविता घडते पातक ।
जवरी भोगी सुख विषयांचे ॥३॥
रागद्वेषनिंदा भूतांचा मत्सर ।
तेणे न करावा उच्चार संत ऐसा ॥४॥
लोभ दंभ मान विषयांचा आदर ।
तो संत साचार बोलू नये ॥५॥
बहेणि म्हणे वृत्ति नाही जो विराल्या ।
तो संत-सोहळा अधःपाता ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग