करवेल भगवे वागविती ज
310.
करवेल भगवे वागविती जटा ।
परी ते आत्मनिष्ठा वेगळीच ॥१॥
ते खूण जाणाया बहु पुण्य पाहिजे ।
मग वरी साजे बाह्यक्रिया ॥२॥
करवेल मुंडन विषय-भोग-त्याग ।
परि न कळे अंग अनुभवाचे ॥३॥
टाकवेल शिखासूत्र घरदार ।
परी अनुभव साचार अगम्य तो ॥४॥
लय लक्ष मुद्रा कळेल आसन ।
परि अनुभव जाण वेगळाची ॥५॥
बहेणि म्हणे येथे नलगे परिहार ।
नळे तो विचार बोलताची ॥६॥
