वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 131. श्रीराम माहात्म्य

सुवर्णाचा शोभे मस्तक

🙏 4. संत नामदेव · ABH-083506 · अभंग क्र. ३०३

303.
सुवर्णाचा शोभे मस्तकी मुगुट | हिरे घनदाट तयावरी ॥१॥
विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भूकुटी | टिळक लल्लाटी केशराचा ॥२॥
कमळाकार नेत्र आकर्ण शोभती | कुंडले झळकती कर्णी ज्याच्या ॥३॥
सरळ नासिक आरक्त अधर | हनुवटी सुंदर राघवाची ॥४॥
कंठाचा आकार कंबुग्रीवा ऐसा | हृदयावरी ठसा द्विजपद ॥५॥
सुकुमार सुरेख जयाचे उदर | ब्रह्मांडे अपार वसती जेथे ॥६॥
नाभी कमळींचा ब्रह्मा नेणे अंत | कडदोरा शोभत कटी ज्याच्या ॥७॥
दंडी पेट्या करी जडित मुद्रिका | पिवळा नेटका पीतांबर ॥८॥
केशराची उटी सरळ बाहुदंड | चिमणा कोदंड हाती ज्याच्या ॥९॥
गर्जती नेपुरे कोमळ चरणी | वज्राकुश चिन्ही विराजित ॥१०॥
कौस्तुभ मुक्‍तमाळा रुळे वैजयंती | भ्रमर भुलती नामा म्हणे॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग